जळगाव ::> अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षार्थींना परीक्षेचा सराव करता यावा म्हणून सुमारे अडीचशे विषयांच्या मॉडेल प्रश्नसंच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी त्याचा चांगला फायदा होणार आहे.
नुकतीच विद्यापीठाने वेबसाईटवर ऑनलाइन परीक्षार्थींसाठी माहिती पुस्तिका देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांसह महाराष्ट्र स्टुडंट युनियन आणि काही विद्यार्थी संघटनांकडून प्रश्नसंच उपलब्ध करून देण्याबाबत मागणी करण्यात आली होती.
अखेर गुरुवारी सुमारे अडीचशे विषयांचे मॉडेल प्रश्नसंच विद्यापीठाने वेबसाईटवर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे. तसेच जस-जसे प्राध्यापकांकडून प्रश्नसंच उपलब्ध होतील, तस-तसे मॉडेल प्रश्नसंच वेबसाईटवर अपलोड केले जाणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. तर गुरुवारी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची मॉक टेस्ट घेण्यात आली.