कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रासाठी १५ ऑक्टोंबर पर्यंत ऑनलाईन अर्जाचे आवाहन

Jalgaon जळगाव माझं खान्देश

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २९ व्या पदवीप्रदान समारंभात ज्या विद्यार्थ्यांना पदवी/पदवीका प्रमाणपत्र घ्यावयाचे आहेत त्यांनी १५ ऑक्टोंबर, २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे आहेत.

विद्यापीठातर्फे ऑक्टोंबर/नोव्हेंबर २०१९ व त्यापूर्वी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज विद्यापीठाच्या http://www.nmu.ac.in या संकेतस्थळावर Home Page वरील Student Corner Examination Convocation वर उपलब्ध आहेत. विनाविलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. १ सप्टेंबर, २०२० ते १५ ऑक्टोंबर ,२०२० पर्यंत आहे.

उत्तीर्ण वर्षापासून पाच वर्षाच्या पदवीप्रमाणपत्र शुल्क रूपये ३५०/- असून उत्तीर्ण वर्षापासून पाच वर्षा पेक्षा जास्त कालावधी झाला असल्यास रूपये एक हजार रूपये भरावे लागतील. पदवीप्रमाणपत्राचे शुल्क क्रेडिट कार्ड/डेबीट कार्ड/ नेट बँकिग द्वारे ऑनलाईल भरावे असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक बी.पी.पाटील यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा रिड जळगावचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि इन्स्टाग्रामवर.

Facebook Instagram Twitter Whatsapp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *