मुक्ताईनगर निमखेडी येथे अंगणवाडीत बेटी बचाव बेटी पढाव हा उपक्रम आला राबविण्यात

Social कट्टा कट्टा मुक्ताईनगर


मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी ::> आज दिनांक 8 रोजी निमखेडी बु//येथे एकात्मिक बाल विकास सेवायोजना अंतर्गत बेटी बचाव बेटी पढाव हा उपक्रम राबवण्यात आला असता मुक्ताईनगर प्रकल्पाचे अधिकारी ईश्वर गोयर व पर्यवेक्षिका सुनिता कविराज पाटील यांच्या उपस्थितीतर किशोर वयातील मुलींना शिक्षणाविषयी व वेगवेगळ्या आरोग्या विषयी मार्गदर्शन करता वेळी ते म्हणाले सावित्रीबाई फुले जन्माला आल्या नसत्या तर आपण आज या कार्यक्रमांमध्ये आपण एकत्र आलो नसतो सावित्रीबाईंनी महिलां साठी पहिली शाळा पुणे येथे सुरू केली होती.

स्वतः मुलींना शिकवण्याचे काम शिक्षिका म्हणून त्यांनी केले सावित्रीबाईंनी मुलींसाठी शिक्षण जर खुले केले नसते तर या भारत देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी झाल्या नसत्या व राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या सुद्धा झाल्या नसत्या अशी बरीचशी उदाहरणे याठिकाणी देता येतील म्हणून मुलींनी शिकले पाहिजे असे विषयावर मार्गदर्शन श्री ईश्वर गोयल यांनी केले
तसेच बेटी बचाव बेटी पढाव या कार्यक्रमाच्या निमित्त आधारित रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले तसेच मुलींनी चटई विकणे मेंदी काढणे उपक्रम केले असता सि,डि,पी,ओ , श्री ईश्वर गोयर साहेबानी त्यांचे कौतुक करुन मार्गदर्शन केले असता या कार्यक्रमाला सर्व सेविकांनी व मदततीसने सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *