निमगूळ येथील मुलीच्या मारेकऱ्यांना अटकेची भाजपच्या महिलांची मागणी

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव निषेध

जळगाव प्रतिनिधी ::> धुळे जिल्ह्यातील निमगुळ येथील दोन वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाचा भाजप महिला आघाडीतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले.

या घटनेतील मारेकऱ्यांना त्वरित अटक होऊन खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडितेला न्याय द्यावा. अशा घटना घडणे म्हणजे विकृत मानसिकतेवर कायद्याचा वचक राहिलेला नसल्याचे दिसते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देताना माजी आमदार स्मिता वाघ, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा दीप्ती चिरमाडे, महापौर भारती सोनवणे, नगरसेविका उज्वला बेंडाळे, सरिता नेरकर, रेखा वर्मा, नितू परदेशी आदी उपस्थित होत्या.