छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई तात्काळ करावी : जामनेर शिवभक्तांची तक्रार

जामनेर

चिलगांव ता. जामनेर प्रतिनिधि (गजानन सरोदे ) >> तमाम मराठी माणसाची अस्मिता असणाऱ्या राष्ट्रपुरुष हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा सोशल मीडियावर अवमान करणार्‍या मुजोरी काँमेडियन अँग्रमी जोशुआ व सौरव घोष यांचा सर्वत्र निषेध होत असून त्यांच्या विरोधात जामनेर पोलिस ठाण्यात मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.


मुंबई मध्ये एका समाज माध्यमावर स्टँडप काँमेडी करणारी अँग्रिमा जोशुआ व सौरव घोष यांनी हिंदुस्तानचे राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर विनोद करून त्यांच्या नावाचा वारंवार एकेरी भाषेत उल्लेख केला आहे. सदर व्हीडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यावर देशभरातून तीव्र पडसाद ऊमटु लागले आहेत.

छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या दोघं समाजकंटकांचा सर्वच स्तरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. छत्रपती शिवरायांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्यामुळे तमाम शिभक्तांची मने दुखावली गेली असुन पोलिस प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत जामनेर मध्ये शिवभक्तांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महापुरुषांचा अवमान करणार्‍या समाज कंटकांना धडा शिकविण्यासाठी तमाम शिवभक्त खंबीर आहेत. नंतर कूणी कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून आम्हाला दोष देऊ नये, आम्ही कायदा हातात घेण्याआधीच छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर लवकरात -लवकर योग्य ती कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन शिवभक्तांनी पोलीस ठाण्यात सादर केले.

यावेळी पोलिस ठाणे अंमलदार संदीप सुर्यवंशी, पोलिस नाईक हंसराज वाघ व होमगार्ड समादेशक भगवान पाटील यांनी त्वरीत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या वेळी युवा समाजसेवक अविनाश बोरसे, विशाल लामखेडे, चेतन पाटील, गणेश सुर्यवंशी, अक्षय जोशी,करण पाटील आदी शिवभक्त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *