पहुर येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ईदनिमित्त गरजूंना शिरखुर्मा वस्तूंंचे वाटप…

जामनेर पहूर

पहुर. ता.जामनेर-कोविड१९या कोरोना विषाणू ने जगभरासह देशातील बहुतेक राज्यासह जिल्ह्यातील खेड्यात पर्यंत ही दस्तक दिली आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात २महिन्यापासून लाँकडाऊन सुरू आहे. परिणामी सर्व स्तरावर कामगार, मजूर, नोकरदार घरीच आहेत. या काळात विविध सामाजिक व राजकीय पक्षातर्फे गरजूंना अन्न धान्य वाटप करण्यात येत आहे. यातच मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान सणचाही समारोप होत आहे.

ईद येऊन ठेपली असून समाजातील गरीब, गरजूंना हातात पैसा नसल्याने ईद सणावर विरजण पडले आहे. ही परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रफुल्ल रायचंद लोढा यांनी पहुर पेठ येथील  मुस्लिम समाजातील गरजवंताना शिरखुर्मा वस्तूंंचे वाटप करण्यात आले.यावेळी भास्कर शंकर पाटील, अशोक देशमुख, शाम सावळे शैलेश पाटील, किरण पाटील, राजु जंटलमन, शरद पांढरे, रवी मोरे, सलिम शेख कादर,राजु किसन पाटील, पठाण मामु, वसिम शेख,सलिम शाह, शाकिर शेख,आमिन शेख,सलिम डायनोमा,आशीष माळी, ईरफान शेख,आदी सह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *