राष्ट्रवादीकडून इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारविरुद्ध मुक्ताईनगरात निषेध

Politicalकट्टा अपघात कट्टा निषेध मुक्ताईनगर

मुक्ताईनगर >> राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी मुक्ताईनगर येथे इंधर दरवाढीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. इंधन दरवाढ मागे घेऊन तत्काळ दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी भारत पेट्रोलपंपासमोर घोषणाबाजी करून दरवाढीचा निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, जिल्हा युवक अध्यक्ष अॅड.पवन पाटील, तालुकाध्यक्ष यू.डी.पाटील, युवक अध्यक्ष सईद खान, रवींद्र दांडगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.