वरणगाव ::>भुसावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक शुक्रवारी (दि.१८) रोजी वरणगाव येथे होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. बैठीकीला भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, युवक जिल्हाध्य्क्ष रवींद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष अरविंद मनकरी, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र चौधरी यांची उपस्थिती राहणार आहे. नागेश्वर मंदिर रोडवरील मराठा समाज मंगल कार्यालयात सायंकाळी ४ वाजता ही बैठक होणार आहे. उपस्थितीचे आवाहन तालुकाध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष संतोष माळी, गजानन वंजारी यांनी केले आहे.