खडसेंच्या स्वागतासाठी जळगावात राष्ट्रवादी सज्ज ; जिल्ह्यातील आता ‘या’ मोठ्या नेत्याचा पाठींबा !

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

रिड जळगाव टीम ::> जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे संकेत जळगावात पत्रकारांशी बोलताना दिले. ‘एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल. आम्ही एकनाथ खडसे यांचे पक्षात स्वागतच करू’, अशी प्रतिक्रिया ही गुलाबराव देवकर यांनी दिली आहे.

‘भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाविषयी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नेते निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. वरिष्ठ नेत्यांनी खडसेंबाबत सकारात्मक भूमिका घेतली तर आमचा त्याला पूर्ण पाठिंबा असेल. खडसेंच्या प्रवेशामुळे पक्षाला फायदा होणार असेल, पक्षसंघटन मजबूत होत असेल तर चांगलेच आहे. आम्ही खडसेंचे पक्षात स्वागतच करू’, असे गुलाबराव देवकर यांनी सांगितले.

गुलाबराव देवकर यांनीही खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशास पाठिंबा दिल्याने चर्चेत आणखी रंग भरला गेला आहे. दुसरीकडे एकनाथ खडसे किंवा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून मात्र यावर तूर्त सस्पेन्स राखण्यात आला आहे.


संदर्भ : Maharashtra Times

1 thought on “खडसेंच्या स्वागतासाठी जळगावात राष्ट्रवादी सज्ज ; जिल्ह्यातील आता ‘या’ मोठ्या नेत्याचा पाठींबा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *