माजी मंत्री एकनाथ खडसे हे सुद्धा राष्ट्रवादीमध्ये येण्याचे संकेत मिळत आहेत: माजी मंत्री डॉ.सतीश पाटील

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

भाजपवाले सहजासहजी खडसेंना राष्ट्रवादीत येऊ देणार नाही

रिड जळगाव टीम ::> डॉ. सतीश पाटील व्यासपीठावर बसलेल्या खासदार उन्मेष पाटील यांच्याकडे कटाक्ष टाकत म्हणाले, राष्ट्रवादीत इनकमिंग सुरु झाले आहेत. अनेक रथीमहारथी पुन्हा राष्ट्रवादीत येत आहेत. एकनाथ खडसे यांचेही राष्ट्रवादीत येण्याचे संकेत मिळत आहेत.

खडसे यांना राष्ट्रवादीकडून पद हवे आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आमदारकीसाठी पक्षाच्या कोट्यातून संधी दिली तरी राज्यपालांनी त्यास मंजुरी देणे आवश्यक आहे.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरु झाले असून माजी मंत्री एकनाथ खडसे हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, राज्यपालांच्या ग्रीन सिग्नलवरच त्यांचा प्रवेश अवलंबून आहे.

भाजपवाले सहजासहजी खडसेंना राष्ट्रवादीत येऊ देणार नाही, असा टोला माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांनी खासदार उन्मेष पाटील यांना लगावला.

पारोळा येथे एका कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी सोमवारी ते बोलत होते. अनेक लोक प्रतिनिधींच्या उपस्थित झालेल्या या कार्यक्रमात अनेकांनी एकमेकांना कोपरखळ्या मारल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *