आत्मक्लेश आंदोलनात हजारो शिक्षकांचा सहभाग घरी बसूनच केलेल्या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद

नंदुरबार नवापूर माझं खान्देश

नवापूर : प्रकाश खैरनार प्रतिनिधी : > राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे वतीने आपल्या महत्त्वांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठि शासनाच्या विरोधात आत्मक्लेश आंदोलन करून शासनावर तिव्र नाराजी व्यक्त केली विशेष म्हणजे हे आंदोलन घरि बसूनच झालयाने यात हजारो शिक्षकांनी सहभाग नोंदवला काहिनी वैयक्तिक तर काहिंनी आपल्या परिवारासह , विशेष म्हणजे आजच्या आंदोलनात महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या दिसलया ते देखील आपल्या चिमुकल्यांसह आपल्या मागणीचा फलक घेऊन आंदोलनात सहभागी झालयाचा फोटो सोशियल मिडिया वर राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , शिक्षणमंत्री यांना आपल्या मागणीचा फलक सह फोटो ट्विटर , व ई मेल पाठवून आपल्याला न्याय देण्याची मागणी केली आहे.

राज्यातील उच्च माध्यमिक विभागाचे आज पर्यंत अनेक छोटे मोठे आंदोलने करून आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला परंतू या कठोर सरकारने या शिक्षकांची काडिमात्र दखल घेतली नसून फक्त यांच्या वर आश्वासनाचा पाऊस पडला .म्हणून लोकडाउन सूरू असतांना आज संघटनेने आपल्या सदस्यासह घरि बसूनच आंदोलन केले व यात प्रचंड प्रतिसाद मिळालयाने हजारो शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला.


महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघास दिलेल्या आश्वासनानुसार
(१) राज्यातील मूल्यांकन अपात्र घोषित व घोषित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय तुकड्यांना 11 मार्च 2020 च्या वित्त विभागाच्या मंजुरी नुसार अनुदान घोषित करणे कामी तात्काळ शासन आदेश निर्गमित करावा.


(२) 2003-2004 पासून 2017-19पर्यंतच्या वाढीव व व्यपगत पदांना मंजुरी देऊन त्यावर कार्यरत शिक्षकांना वेतन मिळणे कामी आदेश निर्गमित करावेत.


(३) राज्यातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) विषय शिक्षकांना अनुदान देऊन वेतन द्यावे.
(४) 2 मे 2012 नंतर नियुक्त शिक्षकांना मान्यता व वेतन द्यावे.


(५) अकरावीच्या किमान परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना बारावीत प्रवेश देण्यात यावा.


(६) कोरोणाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचे अकरावीचे प्रवेश करण्याचे अधिकार संबंधित शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात यावेत.


(७) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना कोरोणाच्या पार्श्वभूमीवर दारू दुकान, चेक पोस्ट, सर्वेक्षण, विलगीकरण इत्यादी कामाऐवजी जनजागृती नोंदी इत्यादी कामे द्यावीत . वरील कामावर कार्यरत शिक्षकांना आवश्यक संरक्षण कवच मास्क औषधे व एक कोटीचा विमा संरक्षण द्यावे.


या व इतर महत्त्वाच्या प्रश्नावर कित्येक वेळा चर्चा करून, पत्र देऊनही शासन निर्णय घेत नाही. कृपया यावर तात्काळ निर्णय घेण्यात यावा. यास्तव आज दिनांक 26 मे 2020 रोजी संपूर्ण राज्यात सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक अनुदानित/ विनाअनुदानित/ समस्याग्रस्त ग्रस्त व इतर शिक्षक व आम्ही महासंघाचे सर्व तालुका, जिल्हा व राज्य पातळीवरील सर्व कार्यकारणी सदस्य व पदाधिकारी उपोषणाद्वारे आत्मक्‍लेश आंदोलन घरीच बसून करीत आहोत.

कृपया आपण याची दखल घ्यावी व आमच्या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करावे, हि विनंती. असे निवदने देण्यात आली . आजच्या या आंदोलन संबंधि प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी शिक्षणमंत्र्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी फोन रिसीव केला नाहि तर शिक्षक आमदार वसंत काळे यांच्या शी संपर्क साधला असता आज शिक्षणमंत्र्यांना भेटुन चर्चा करतो अश्या प्रतिक्रिया दिलया तर माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांना संपर्क साधला असता आज माहीती घेतो व बोलतो अशा प्रतिक्रिया दिलया आपलया मागण्या मान्य न झालयाने शिक्षकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया असून सरकार विरोधात तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहेत आजच्या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष प्रा.डॉ. संजय शिंदे ,नाशिक , प्रा मुकुंद आंधळकर मुंबई ,सह जुक्टोचे पदाधिकाऱ्यांसह सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व तालुक्यातील शिक्षक राज्यातील वाढिव / प्रस्तावित पदांवरील क्रुती समितीच्या शिक्षकांनी सहभागी होऊन आजचे आंदोलन यशस्वी केल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *