३५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग; नशिराबादमध्ये दोघांविरूद्ध गुन्हा

क्राईम नशिराबाद

जळगाव >> वाद सोडवण्यासाठी गेलेल्या ३५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील भादली येथे २९ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता घडली. भादली येथे पती-पत्नी घरी होते. जुन्या भांडणाच्या कारणावरून मनोज सुरेश सपकाळे याने दारूच्या नशेत शिवीगाळ व महिलेचा विनयभंग केला. मनोजच्या आईने शिवीगाळ करून मारहाण केली. विवाहितेच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध नशिराबादला गुन्हा दाखल झाला.