भावाला कामाला नेले म्हणून लाकडी दांड्याने डोक्यावर एकाला मारहाण

क्राईम नशिराबाद

नशिराबाद प्रतिनिधी::> येथील एकाने ‘माझ्या भावाला तू कामावर का घेऊन गेला’, याचा राग मनात ठेवत लाकडी दांड्याने डोक्यावर मारहाण करून दुखापत केली. याबाबत नशिराबाद पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.


फिर्यादी महेश अरुण महाजन त्याच्या भावाने प्रमोद दत्तात्रय माळी यांच्यासोबत कामाला का गेला? याचा राग आल्याने पेठ परिसरातील मागील बाजूस खंडेराव मंदिरापुढे असलेल्या जागेवर ६ अाॅक्टाेबर राेजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास टिकमच्या लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. यात महेश महाजन हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत महेश महाजनच्या फिर्यादीवरून प्रमोद माळीविरुद्ध गुन्हा दाखल झाला अाहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *