नशिबादजवळच्या शोरूममधील विम्याच्या पैशांचा अपहारप्रकरणी दोघांवर गुन्हा

Jalgaon Jalgaon MIDC क्राईम जळगाव नशिराबाद

नशिराबाद >> जळगाव-भुसावळ रोडवरील नशिबादजवळच्या सरस्वती फोर्ड या चारकीच्या शोरुमध्ये विमा भरण्यासाठी आलेल्या ग्राहकाचे पैसे जमा न करता कॅशिअर आणि महिला कर्मचाऱ्याने अपहार केला तसेच शोरूम मालकाची फसवणूक आणि दमदाटी करत शिवीगाळ केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरस्वती फोर्ड शोरुममधील दीपा बबन पाटील उर्फ दीपा विलास पाटील ही महिला इन्शुरन्स एक्सिकेटीव्ह म्हणून २ वर्षापासून व विवेक सूर्यवंशी हा कॅशियर पदावर दीड वर्षांपासून कामाला होते.

दीपा पाटील हिने शोरुमच्या ग्राहकाकडून २३ ऑक्टोबर रोजी विम्याचे ३१६६१ रुपये घेऊन कॅशियर सूर्यवंशींकडे जमा केले नाही. तसेच सूर्यवंशी यांनी विम्याचे पैसे जमा न करून घेताच ग्राहकाची पॉलिसी काढून दिली.

हा सर्व प्रकार व्यवस्थापनाच्या लक्षात आल्याने याप्रकरणी एचआर मॅनेजर राहुल कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक साळुंखे करीत आहेत. दरम्यान, महिलेच्या फिर्यादीवरूनही या आधी शोरुमचे मालक मुकेश टेकवाणी व धवल मुकेश टेकवाणी यांच्यावर गुन्हा दाखल आहे.