नारायण राणें सेनेमुळेच मोठे अन सेनेमुळेच आले रस्त्यावर : गुलाबराव पाटील

Politicalकट्टा जळगाव

जळगाव : > कोरोना हा काही महाराष्ट्राने आणलेला नाही. सर्वत्र जगात व देशात हा संसर्ग पसरला आहे. ही आपत्ती आहे, त्याला सामोरे गेले पाहिजे. काही त्रुटी असतील तर त्याला सामोरे गेले पाहिजे. कोरोना या संसर्गजन्य आजाराने देशावर मोठी आपत्ती निर्माण केली आहे. राष्ट्रपती लागवट लावावीच असेल तर गुजरात, उत्तर प्रदेश व दिल्ली पण आहे, तेथेही लावावी लागेल. शिवसेनेशी राणे यांचे जुने नाते आहे, सेनेमुळेच ते मोठे झाले अन् सेनेमुळेच ते रस्त्यावर आले असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.

या परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज आहे. राष्ट्रपती लागवट लागू करायची असेल गुजरात, दिल्ली व उत्तर प्रदेशातही करावी लागेल. मात्र या काळातही काही जण राजकारण करीत असल्याचे टोलाही यावेळी गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांना लगावला आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरल्याने राज्यात राष्ट्रपती लागवट लागू करण्याची मागणी केली होती. त्यावर मंगळवारी गुलाबराव पाटील यांनी ही राजकारण करण्याची वेळ नसून आपत्तीच्या काळात एकत्र येण्याची वेळ असल्याचे मत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *