मुक्ताईनगर >> तालुक्यातील डोलारखेडा वनहद्दीत गावातील वन कार्यालयाच्या बाजूला असलेल्या गुरांच्या हौदाजवळ वाघाने, आठवडाभरात पाणी पिण्यासाठी तब्बल दोन वेळेस हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी मध्यरात्री तसेच पाच ते सहा दिवसांपूर्वी रात्री आठ वाजेच्या सुमारास वाघ या ठिकाणी आल्याचे सांगितले जाते. दोन दिवसांपूर्वी तालुक्यात वाघाने गायीची शिकार केल्याची घटना समोर आली आहे.
