मुक्ताईनगर प्रतिनिधी ::> जळगाव जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलल्यानंतर आता प्रशासकीय बदल्या होत आहे. मुक्ताईनगर येथील तहसीलदार यांची नुकतीच बदली झाली आहे. तहसीलदार शाम वाडकर यांची बदली अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीला झालेली आहे. तर जळगाव सं. गा. यो. विभागातील श्वेता संचिती ह्या मुक्ताईनगर तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासन उपसचिव डॉक्टर माधव गिर यांनी दिनांक 1 ऑक्टोंबर 2020 गुरुवार रोजी काढलेले असून त्यांनी आपल्या पदावर तात्काळ रुजू होण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
