मुक्ताईनगर प्रतिनिधी ::> येथील नगराध्यक्षा नजमा तडवी यांनी मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याच्या कारणावरून गिरीश चौधरी यांनी औरंगाबाद खंडपिठात अॅड. भाऊसाहेब देशमुख यांच्यातर्फे याचिका दाखल केली.
कायद्यानुसार निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. यामध्ये नंतर सरकारने सहा महिन्यांची मुदत एक वर्ष केली होती. परंतू नगराध्यक्षा तडवी यांनी वाढीव मुदतीपेक्षाही सुमारे तीन महिन्यांच्या विलंबाने प्रमाणपत्र सादर केल्याने याचिका दाखल केली आहे. मात्र, प्रमाणपत्र मिळताच ते सादर केल्याचे तडवी यांनी सांगितले.