मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी >> शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे आयोजित पहिले राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन १३ फेब्रुवारी २०२२ रोज रविवारला एक दिवसीय संमेलन आदिशक्ती संत मुक्ताईनगरीत मुक्ताईनगर येथे आयोजित करण्यात आलेले आहे.

या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा राज्य शासन पुरस्कार प्राप्त साहित्यिक कोल्हापूर येथील डॉ.श्रीकांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी बाल कुमारांसाठी कथा, कादंबरी, काव्य व एकांकिका लेखनाचे महत्वाचे कार्य केलेले आहे.

ज्येष्ठांसाठी ही लॉकडाउन काळामध्ये विश्वातली पहिली कादंबरी लोकडाऊन लिहून प्रकाशित केलेली आहे यातून या काळामध्ये सकारात्मक संदेश देणारी ही पहिली कादंबरी ठरली.

ही कादंबरी मराठी सोबतच इंग्रजी, हिंदी, गुजराती व कन्नड भाषेमध्ये सुद्धा प्रकाशित झालेली आहे हा लेखकाचा गौरवच म्हणावा लागेल तसेच पश्चिम महाराष्ट्रातील ऊस प्रश्नावर त्यांची ऊसकोंडी ही कादंबरी सुद्धा प्रकाशित झालेली आहे.

या कादंबरीला डॉ. सदानंद देशमुख यांनी पाठराखण केलेली आहे. डॉ.श्रीकांत पाटील हे एक उत्तम वक्ते सुद्धा आहेत त्यांची सातशेहून अधिक व्याख्याने झालेली आहेत.

त्यांना आत्तापर्यंत ५० हून अधिक पुरस्कारांनी गौरवलेले आहे २५ हून अधिक साहित्य संमेलनात परिसंवाद वक्ता परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून त्यांचा सहभाग लाभलेला आहे.

संमेलनाचे उद्घाटक अमरावती येथील ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, समीक्षक तथा उस्मानाबाद येथील ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कथाकथनाचे अध्यक्ष डॉ. सतीश तराळ यांची निवड करण्यात आली आहे.

त्यांनी वाचन, लेखन, संशोधन, प्रबोधन व समिक्षण, पत्रकार समाजसेवक त्याच प्रमाणे उत्कृष्ट वक्ता म्हणून नावलौकिक मिळवला आहे. डॉ.सतीश तराळ यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना सह विविध प्रवाही साहित्य संमेलनामध्ये विक्रमी सहभाग राहिलेला असून राज्यातील विविध संस्थांनी त्यांना सन्मानाचे पुरस्कार देऊन गौरवांकित केले आहे.

विदर्भ साहित्य संघाचा सरचिटणीस म्हणून व महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळांमध्ये संपादक गुरुदेव मासिकाचे संपादक म्हणून डॉ. तराळ यांचे नेत्रदीपक कार्य आहे त्यांचे विविध साहित्य विविध विद्यापीठांतील अभ्यासक्रमामध्ये समावेश झालेला आहे.

या संमेलनाचे कथाकथनाचे अध्यक्ष म्हणून कोल्हापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ.चंद्रकांत निकाडे तर परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून औरंगाबाद येथील साहित्यिक डॉ.सुभाष बागल तर कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून अकोला येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक तुळशीरामजी बोबडे यांची निवड करण्यात आली आहे.

या संमेलनाचे कार्यवाहक फाऊंडेशनचे सचिव साहित्यिक प्रमोद पिवटे सहकार्यवाह जळगाव जिल्हा दक्षता समितीचे प्रमुख प्रा. डॉ. अजय पाटील व जिल्हा सचिव प्रा. राजकुमार कांकरिया संयोजक जिल्हा संघटक हकीम आर.चौधरी सहसंयोजक बुलढाणा जिल्हा दक्षता समिती प्रमुख मनोहर पवार तर निमंत्रक कार्यकारी सदस्य तथा ग्रामीण लेखक निंबाजी हिवरकर आहेत असे या संमेलनाचे मुख्य आयोजक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *