कुऱ्हा काकोडा कैलास कोळी प्रतिनिधी >> वडोदा वनक्षेत्र अंतर्गत राजुरा येथील कक्ष क्रमांक ५६५ मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड प्रकरणी अटकेत असलेल्या सुभाष भाऊसिंग पावरा व नानभाऊ राजमल पावरा या दोघा संशयित आरोपींना न्यायालयाने १९ रोजी १ दिवसाची वन कोठडी दिली.
वनक्षेत्र अधिकारी आशुतोष बच्छाव यांनी मुक्ताईनगर व वडोदा कर्मचारी व मजूर यांच्यासह अवैध वृक्षतोड केलेल्या जागेवर जाऊन पाहणी केली. तसेच पुण्यातील काही संशयित आरोपींचा शोध घेतला असता घटनास्थळी तीन मोटारसायकल, कोयते, विळे, कुऱ्हाडी, करवत, सागवान लाकूड, आळजात लाकूड असा मुद्देमाल आढळून आला. अंदाजे ५५ हजार २९० रुपये किमतीचा हा मुद्देमाल जप्त केला. महिन्याभरात ही तिसरी कारवाई असून पुढील तपास वनपाल भावना मराठे करीत आहे.