मुक्ताईनगर नगरपंचायतीचा भोंगळ कारभार

मुक्ताईनगर सिटी न्यूज

(मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी)

मुक्ताईनगर हे नगरपंचायत म्हणून संस्था काही दिवसांपूर्वी तिचा जन्म झालेला असून हे गाव अगोदर ग्रामपंचायत अशी नोंद होती आज रोजी हे पद लोकनियुक्त आहे ( 1)नगराध्यक्ष व ( 17) नगर सेवक आहे अशी बॉडी आहे. या शहराच्या विस्तार खूप मोठा आहे.

यासाठी नगरपंचायतीने स्वच्छता मोहीम साठी घंटागाडीची ई, टेंडर काढले आहे व आणि तशी व्यवस्था पण करीत आहे. शहरातील संपूर्ण घाण कचरा व मेलेले गुरे-ढोरे कुत्रे उंदीर डुकरे व लहानसहान प्राणी या घंटागाडीने शहराच्या उत्तरेकडील बाजूला म्हणजे ब-हाणपुरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला स्मशानभूमी जवळ टाकत आहे आणि तो कमीत कमी ऐवढा60आर, एवढ्या क्षेत्रफळ असलेल्या जागे मध्ये जमा करीत आहे, तो एवढा घाण कचरा आहे की हजारो क्विंटल मध्ये आहे.

या घाणीच्या साम्राज्यामुळे याठिकाणी स्मशान भूमी मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे या ठिकाणी १० ते १५ मिनिटे बसणे सुद्धा कठीण झालेले आहे याठिकाणी दुर्गंधीचे व धुरामुळे अक्षरशा श्वास घेणे कठिण झालेले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या घाणीच्या साम्राज्याच्या 50फूट अंतरावर हतनूर धरणाचे पूर्णा नदीचे बॅकवॉटर आहे आणि पावसाळ्यात ही संपूर्ण घाण या बॅक वॉटर मध्ये जाऊन ते हातनुर धरणामध्ये जमा होत असते यामुळे संपूर्ण पाणी अशुद्ध होत आहे आणि विशेष म्हणजे मुक्ताईनगर ला आणि 132 गावांची पाणीपुरवठा योजना बोदवड मनुर हीसुद्धा पूर्णा नदीवरून घेतलेली आहे.


आणि हतणुर धरणातून सुद्धा बर्‍याच मोठ्या गाव शहरांना व गावांना पाणीपुरवठा केलेला आहे
म्हणून मुक्ताईनगर नगरपंचायत हेतु पुरस्कर जनतेच्या आरोग्याशी व जीवनाशी खेळत आहे अशा नगरपंचायत वर प्रशासन कारवाई करेल काय? असा प्रश्‍न या परिसरातील सुज्ञ नागरिकांना भेळसावत आहे,

याबाबत माहिती घेतलीअसता मुक्ताईनगर चे विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी या बाबतीत गेल्या मार्च महिन्यात मुख्याधिकारी यांना संबंधित पर्यावरण व मानवी आरोग्य विरोधी डम्पिंग ग्राउंड दुसरीकडे हलवण्याच्या सूचना केलेल्या होत्या.


तरीपण आज पर्यंतसुद्धा प्रशासनाने कोणतेच पाऊल उचलले दिसत नाही 10ते 15दिवसावर पावसाळा येऊन ठेपला आहे, कोरोना सारखी जागतिक महामारीचा कहर चालू आहे तरीपण ढिम् पालिका प्रशासनाच्या काही हालचाली दिसत नाही तर इतर वेळी पालिका प्रशासन कसे असेल याचा विचार न केलेलाच बरा म्हणून , ही समस्या चां निपटारा होणार की नाही? अशी शंका निर्माण झालेली आहे.


या बाबीकडे शासनाने व प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देणे गरजेचे आहे आणि या घाणीच्या साम्राज्यामुळे मानवी जिवनाला होणारा धोका होऊ नये यासाठी पालिकेच्या वरिष्ठ जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी या परिसरातील जनतेची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *