नोंदणीचा ओघ पाहता दररोज शंभर वाहने मोजावीत – खा. उन्मेश पाटील यांचे आदेश

चाळीसगाव सिटी न्यूज

चाळीसगाव प्रतिनिधी : > लॉकडाऊनमुळे आधीच शेतकरी हतबल झालेला असल्याने केंद्राने चांगला भाव दिल्याने शेतकरी बांधवानी मोठ्या प्रमाणात कपाशी विक्री नोंदणी केली आहे. या तुलनेत अतिशय संथगतीने कापूस मोजला जातो आहे. येत्या पावसाचे वातावरण पाहता अतिशय कमी कालावधी शिल्लक असतांना कुठलेही कारण न देता जिनिंग चालकांनी नोंदणी झालेल्या कापसाची मोजणी करावी.

आजची कापूस मोजणी सरासरी पाहता शेतकऱ्यांचा रोष वाढतो आहे. यासाठी मजुरांची उपलब्धता करावी हवी तर आसपासच्या मजुरांची मदत घ्या दररोज शंभर वाहने मोजण्याचे नियोजन करा अन्यथा कारवाईस सामोरे जा असा सज्जड दम खासदार उन्मेश पाटील यांनी दिला.

आज चाळीसगाव भोरस स्थित सत्यम कोटेक्स जिनिंगला त्यांनी भेट दिली. यावेळी सीसीआयचे अतिरिक्त महाव्यवस्थापक एस जे पाणीग्रही, ग्रेडर एस पी सिंग, जिनिंग व्यवस्थापक काकाजी अग्रवाल, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, बाजार समिती प्रभारी सचिव अशोक पाटील, जेष्ठ नेते पद्माकर पाटील, नरेनकाका जैन,दिनकर राठोड, वीरेंद्र पवार, योगेश वाणी शेतकरी आदी उपस्थित होते.

व्यवस्थापक यांना धरले धारेवर

चाळीसगाव जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीकडे शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात कापसाची नोंदणी केली आहे. शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी यंदा मोठ्या भावाची घोषणा केल्याने शेयकऱ्यांचा ओघ सीसीआय कडे वाढला असून त्या तुलनेत कापूस मोजणीची सरासरी अतिशय अल्प असून शेतकऱ्याचा रोष वाढत असल्याने खासदार उन्मेश पाटील यांनी आज सीसीआय सी.जी.एम एस.जे.पाणीग्रही यांना धारेवर धरत जिनिंग मालकांशी संवाद साधत आजच्या आज मजुरांची उपलब्धता करा हवे तर आसपासच्या मजुरांची मदत घ्या तात्काळ व्यवस्था करा अन्यथा सीसीआय ने पेमेंट थांबवावे असा दम भरला.

चाळीसगावातील कापूस खरेदीसाठी तळेगाव जिनिग मध्ये देखील खरेदी वाढवा सीसीआयने देखील प्रशासनात ढिलाई न ठेवता आपली कार्यक्षमता वाढवून जिनिग चालक मालकांच्या पाठीशी उभे राहून शेतकऱ्यांच्या कापसाची मोजणी करण्यासाठी घाई करण्याच्या सूचना कराव्यात अशी भूमिका घेतली. यावेळी अतिरिक्त व्यवस्थापक पाणीग्रही यांनी आपल्या सूचनेनुसार ताबडतोब कार्यवाही करतो जास्तीत जास्त कापूस मोजणीचे नियोजन करतो अशी ग्वाही त्यांनी खासदार उन्मेश पाटील यांना दिली.

याप्रसंगी पाचोरा बाजार समिती सभापती सतीश शिंदे ,धरणगाव जिनिग संचालक मच्छीन्द्र पाटील आदी पदाधिकारी यांचे सह शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना असलेल्या समस्या मार्गी लावल्यात. पाणीग्रही यांनी सीसीआय करीत असलेल्या जिल्हयातील कापूस खरेदी बाबत सुरू असलेला आढावा सादर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *