खडसे काका भाजप सोडणार का? हा प्रश्न सुनबाई खा.रक्षा खडसेंना विचारा : खा. प्रीतम मुंडे

Politicalकट्टा कट्टा महाराष्ट्र

रिड जळगाव टीम ::> भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत पुढील काही दिवसांमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. अशातच विविध पक्षांकडून खडसेंना ऑफर आल्या आहेत. खडसे हे मुंबईतून खाली हात परतले असताना आजी-माजी आमदार, पदाधिकारी खडसेंच्या समर्थनार्थ वेगवेगळे दावे करत आहेत.

तर एका बाजूला खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तविण्यात येत असताना आता बीडच्या भाजपा खासदार प्रीतम मुंडेंनी याबाबतीत सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. खडसे काका भाजप सोडणार का ? हा प्रश्न त्यांच्या खासदार सूनबाई रक्षा खडसे यांना विचारायला हवा असं सांगत माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविषयी बोलण्यास नकार दिला. खडसे काका यांचा निर्णय योग्य वेळ आल्यावर कळेलच असंही त्या म्हणाल्या.