आमदार मंगेश चव्हाण यांना दर सोमवार, मंगळवारी लावावी लागणार चाळीसगाव पोलिस ठाण्यात हजेरी

Jalgaon Jalgaon MIDC Politicalकट्टा कट्टा क्राईम चाळीसगाव जळगाव जळगाव जिल्हा निवडणूक रिड जळगाव टीम शेती

प्रतिनिधी जळगाव >> महावितरणचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुक शेख यांना मारहाण केल्याप्रकरणी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांना सोमवारी जिल्हा न्यायालयाने अटीशर्तींवर जामीन मंजूर केला.

न्यायाधीश छाया पाटील यांच्या न्यायालयात आमदार चव्हाण यांच्यासह सर्व संशयितांच्या जामीन अर्जावर दोन्ही पक्षांचे युक्तिवाद १ एप्रिल रोजी पूर्ण झाले होते.

दरम्यान, सोमवारी न्यायालयाने सर्वांना जामीन अर्ज मंजूर केले. यात १५ हजार रुपयांचा जातमुचलका, दोन हजार रुपयांची कॅश सिक्युरिटी तसेच दर सोमवार, मंगळवारी सकाळी ९ ते १२ वाजेच्या दरम्यान चाळीसगाव पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याची अट घालण्यात आली.

आमदार चव्हाण यांच्यासह ३१ जणांतर्फे अॅड. गोपाळ जळमकर व अॅड अकील इस्माईल तर सरकार पक्षातर्फे अॅड. रमाकांत सोनवणे यांनी काम पाहिले.