चोपड्याच्या आमदार लता सोनवणेंचे जात प्रमाणपत्र फेरपडताळणीचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

Aurangabad Politicalकट्टा कट्टा चोपडा महाराष्ट्र

चोपडा प्रतिनिधी >> चोपडा मतदार संघातील आमदार लता सोनवणे यांच्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील जात प्रमाणपत्र अवैध ठरवणारा पडताळणी समितीचा निर्णय मुंबई औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या.श्रीकांत कुलकर्णी यांनी रद्द ठरवला.

आमदार होण्यापूर्वी सोनवणे जळगाव मनपात नगरसेविका होत्या. त्यावेळी त्यांनी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी नंदुरबारच्या समितीकडे पाठवले होते. त्यांचा दावा जात पडताळणी समितीने अवैध ठरवला.

याविरुद्ध सोनवणे यांनी ज्येष्ठ विधिज्ञ आर.एन. धोर्डे, अॅड. भरत वर्मा यांच्यावतीने खंडपीठात आव्हान दिले. लता सोनवणे यांनी जळगावच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून जात प्रमाणपत्र मिळवले होते.

मूळच्या चोपडा तालुक्यातील रहिवासी असल्याने त्यांनी अमळनेर उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्रमाणपत्र घेणे गरजेचे होते. खंडपीठाने त्यांना योग्य अधिकाऱ्यांकडून जात प्रमाणपत्र प्रथम घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर ते पडताळणी समितीकडे सादर करावे, असे आदेश दिले.