जळगाव प्रतिनिधी ::> आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर टीका करत, त्यांनी मागील पावसाळ्यात शहरातील रस्त्यावर झाडे लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सध्या पाचोरा शहरातील रस्त्यावर झाडे लावण्यास जागा शिल्लक नसल्याने त्यांनी त्यांच्या शेतात झाडे लावावी, असे आवाहन केले.
जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने त्यांनी जळगावच्या रस्त्यांची पाहणी करून तेथे झाडे लावावी, असा खोचक टोला लगावला. पाचोरा येथील माजी आमदार स्वर्गीय आर. ओ. पाटील यांनी त्यांच्या काळात उभारलेल्या शिवतीर्थ या वास्तूचे सुशोभीकरण व खत कारखान्याची नूतन इमारत व यंत्रांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.