भुसावळचे भाजप आ. संजय सावकारे पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याचे संकेत ; वाढदिवसाच्या बॅनरबाजीतून गिरीश महाजनांचा फोटो गायब

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव जळगाव जिल्हा जामनेर भुसावळ

भुसावळ >> भुसावळ मतदार संघातील आमदार संजय सावकारे यांचा आज वाढदिवस असल्याने भुसावळ सह जिल्ह्यात जाहिरात, पोस्टर झळकली आहेत. मात्र या पोस्टर मध्ये माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांचा एकाही बॅनर मध्ये फोटो नसल्याने राजकीय वर्तुळासह जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.

उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने अनेक कट्टर समर्थकांनी सुद्धा प्रवेश केला आहे. तसेच आमदार सावकारे हे एकनाथ खडसे यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख असून ते लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील असा संदेश जणू बॅनरबाजीतून करण्यात आला असल्याचे संकेत दिसत आहेत.

सोशल मीडियावर आमदार सावकारे यांच्या समर्थकांनी जाहिरातीमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे फोटो झळकत आहेत. तर दुसरीकडे जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे (राजुमामा) यांचे ही जाहिरातींमध्ये फोटो दिसत आहे. मात्र माजी मंत्री गिरीश महाजन यांचा बॅनरवरती फोटो दिसत नसल्याने अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. यावरून असे दिसते की खडसे कट्टर समर्थक व भाजपचे विद्यमान आमदार हे लवकरच आपल्या स्वगृही परतणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या समर्थकांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून हेच सांगितले आहे.

भुसावळ येथील भाजप आमदार समर्थक व भाजपचे विद्यमान नगरसेवक यांनी आपल्या केलेल्या जाहिरातींमधून किंवा त्या जाहिरातींमध्ये जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांना स्थान देण्यात आले आहे. मात्र, कुठेही माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार गिरीश महाजन यांना कुठेही स्थान देण्यात आलेले नाही. यावरून भुसावळ येथील भाजप नगरसेवक व कार्यकर्ते हे खडसेंचे समर्थक असल्याचे या माध्यमातून दिसून येत आहे.