भाजप पक्ष हा कार्यकर्त्यांमुळे मोठा आहे, नेत्यांमुळे नव्हे ; गिरीश महाजनांचा नाव न घेता खडसेंना टोला

Politicalकट्टा कट्टा चाळीसगाव रिड जळगाव टीम

चाळीसगाव राज देवरे प्रतिनिधी : पक्ष हा लहान असो किंवा मोठा ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. नेत्यांमुळे पक्ष मोठा होत नसतो. नेते येतात आणि जातातही. कार्यकर्त्यांची फळी पक्षाला मोठे करते. अशा शब्दात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराचा उल्लेख न करता आपलं मन मोकळं केलं. मंगळवारी सायंकाळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये काय चलबिचल सुरू आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी प्रदेश संघटनमंत्री आले.

बैठकीत काही ग्रामीण भागातील पदाधिका-यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्याच काही प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यात. अशी ग्रहाणी मांडली असत. याचाही गिरीश महाजन यांनी बैठकीत चांगलाच समाचार घेतला. विधानसभा निवडणुकीत काय झाले. या प्रश्नाचे उत्तर देताना काही लोकप्रतिनिधींकडे कटाक्ष टाकून, याची पूर्ण माहिती आपल्याला आहे. असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. कार्यकर्ते व पदाधिका-यांची मतेही जाणून घेतली.