मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना हस्तक्षेप करू देणार नाही : आ. चंद्रकांत पाटील

Politicalकट्टा कट्टा मुक्ताईनगर

रिड जळगाव टीम ::> एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाल्याने महाआघाडी विकासात अनेकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. अशातच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रिया मध्ये म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये खडसेंचा प्रवेश होणे माझ्यासाठी धक्कादायक आहे. किंवा महाआघाडी विकासात खडसे यांना घेतांना मला विश्वासात घेतल पाहिजे होत. एवढीच माझी रास्त भूमिका होती.

एखादी राजकीय पक्षाने त्याची पक्ष वाढवावा तो नैसर्गिक विषय आहे. सत्तेमध्ये येतांना ज्या अपक्ष आमदारांनी पाठींबा दिला त्या आमदारांचा विचार करणे गरजेचे आहे. मला माझ्या मतदार संघात खडसेंचा हस्तक्षेप करू देणार नाही. पक्षाध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादी नेते अजित पवार यांची भेट घेणार आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील कोणताच शिवसैनिक खडसे यांना स्वीकार करणार नाही. मी छातीठोकपणे शिवसेना वाढवली आहे. तसेच अनेक आरोप खडसे यांच्यावर करत मी माझ्या स्टाईलने उत्तर देईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.