पांझरा-माळण नदीजोडसाठी तीन पर्यायांवर विचार सुरू : आमदार अनिल पाटील

Politicalकट्टा अमळनेर

प्रतिनिधी अमळनेर ::> तालुक्यातील पांझरा-माळण नदीजोड हा महत्वाकांक्षी प्रकल्प अाहे. हा प्रकल्प कोणत्याही स्थितीत येत्या पाच वर्षात तडीस नेऊ. त्यासाठी निरंतर प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पासाठी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सध्या पाणी सौरऊर्जा, वीज किंवा गुरुत्वाकर्षण पद्धतीने उचलता येईल? याबाबत विचार सुरू आहे.

धुळे येथील पांझरा नदी ते मोहाडी अथवा जवखेडा या भागातून हे पाणी माळणपर्यंत पोहचणार आहे. बंदिस्त जलवाहिनीद्वारे हे पाणी माळणपर्यंत आणून सोडण्यात येईल. हा एक पर्याय, तर दुसरा पर्याय उघड्या चारीतून पाणी आणावे, असा आहे.

यातील दोन्ही पर्यायांची पडताळणी करून हा प्रश्न सोडवला जाईल. जेणेकरून अर्धा तालुका दुष्काळमुक्त होऊ शकेल. तसेच बोरी नदीवरील अमळनेर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी खाटेश्वर बंधारा व कोळपिंप्री-फाफोरा परिसरातील दोन बंधारे कामांचा, पांझरा नदीवरील फुटून वाहून गेलेला ब्राम्हणे बंधारा ही कामे मार्गी लागावी, यासाठी देखील पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत निकड ठरलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे जिल्हा रुग्णालयात रूपांतर करणे, आपत्कालीन स्थितीत ऑक्सिजनयुक्त सर्व खाटा तयार करण्याचे आपले नियोजन असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली.
गजानन पाटील अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *