अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले; अपहरणाचा गुन्हा दाखल

क्राईम

अमळनेर ::> शहरातील पैलाड भागातील एक अल्पवयीन मुलगी २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता बेपत्ता झाली असून तिला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दाखल केली आहे. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे पैलाड परिसरात खळबळ उडाली आहे.