येत्या हिवाळी अधिवेशनात आमदारांना खान्देशी भरीताची मेजवानी ; पालकमंत्री गुलाबराव पाटलांची माहिती

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

जळगाव ::> डिसेंबर महिन्यात नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदारांना खान्देशी भरीताची मेजवानी देणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

पालकमंत्री पाटील यांनी अजिंठा विश्राम गृहात कृषी विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांनी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. खान्देशात भरीताच्या वांग्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याबाबत जिल्हाधिकारी व कृषी विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यामध्ये कृषी महोत्सवाप्रमाणेच भरीत महोत्सवाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नियोजन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे येत्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आमदारांनी खान्देशी भरीताची मेजवानीही देणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.