रिड जळगाव टीम ::> बिहार निवडणुकीसाठी शिवसेनेने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचाही समावेश आहे. यामुळे ‘खान्देशची मुलूख मैदानी तोफ’ आता बिहारच्या रणांगणात धडाडणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने २० जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा समावेश झाला अाहे.
