हिंगोणा येथे आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, माती फाउंडेशनचा उपक्रम

यावल सिटी न्यूज

हिंगोणा ता यावल

कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारतर्फे लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे आता हा लॉक डाऊन तिसऱ्या टप्प्याचा असून आतापर्यंत केंद्र राज्यात विविध कंपन्या तसेच छोटे-मोठे उद्योग धंदे हे बंद असल्याने रोजगार निर्मिती होऊ शकत नसल्याने याचा दुष्परिणाम ग्रामीण भागातील गरीब कुटुंबात दिसून येत आहे कामधंदे नसल्याने या कुटुंबांना आर्थिक चणचण भासू लागली आहे मिळेल ते काम धंदे करून आपल्या कुटुंबाची पोटाचे खळगी भरणारे गरीब कुटुंब या महामारील सामोरे जात असून सध्या शासनाकडून मिळणाऱ्या धान्याच्या प्रतीक्षेत दिसत आहे . ज्या कुटुंबान कडे रेशन कार्डच नाही अशी कुटुंब आजही धान्याच्या प्रतीक्षेत आहे नुकतेच येथील तलाठी दीपक गवई कोतवाल सुमन आंबेकर पोलीस पाटील दिनेश बाविस्कर व रेशन दुकानदार यांनी मोर धरण काळा डोह विटवा वस्ती तसेच शेती शिवारात फिरून आदिवासी कुटुंबांची ज्यांच्याकडे रेशन कार्डच नाही अशा २०० कुटुंबांची यादी करून या कुटुंबांना धान्य मिळण्यासाठी तहसील कार्यालय यावल येथे यादी सुपूर्त केली आहे परंतु १ महिना होउन सुद्धा या कुटुंबांना धान्य मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे विशेष म्हणजे यात बहुतेक आदिवासी पावरा बारेला कुटुंब असल्याने यांना धान्य लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी होत आहे अशा आशयाचे वृत्त प्रसिध्द दखल भालोद येथील माती फाउंडेशन ने घेतली असून हिंगोणा येथील काळाडोह मोर धरण व विटवा वस्ती येथील आदिवासी बांधवांना जिवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले त्यावेळी येथील तलाठी दीपक गवळी माती फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक जावळे तुषार परतणे खेताराम चौधरी चेतन चौधरी चेतन पाटील उमेश झांबरे नेमाराम चौधरी अक्षय परतणे मिलिंद चौधरी चंदन चौधरी भूपती इंगळे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *