मठगव्हाण येथील पाचवीच्या विद्यार्थिनीचे अपहरण व सुटका

अमळनेर क्राईम

अमळनेर प्रतिनिधी ::>मठगव्हाण येथे वास्तव्यास असलेल्या पाचवीतील विद्यार्थिनीचे अपहरण करुन तिला मध्यप्रदेशात पळवून नेल्याची घटना ५ राेजी घडली. याप्रकरणी दोन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. एक पावरा कुटुंब मध्यप्रदेशातून मठगव्हाण येथे मजुरीसाठी आले आहेत. त्या कुटुंबातील पाचवीत शिकणारी १३ वर्षांची अल्पवयीन मुलगी रात्री कुटुंबासोबत झोपलेली असतांना सुरेश वेरसिंग बारेला व शिकऱ्या सीताराम बारेला (दोन्ही रा.झिरण्या,ता.वरला, जि.बडवानी) या दोघांनी तिला उठवून दुचाकीवर बसवून घेऊन गेले. त्यांचा शोध घेतला असता ते ८ रोजी झिरपण्या येथे आढळून आले. त्यांच्या ताब्यातील मुलीला पालकांनी ताब्यात घेतले.