मारवड पोलीस स्टेशनला महाराष्ट्रातून बेस्ट पोलीस स्टेशन म्हणून बहुमान

Social कट्टा कट्टा

सन २०१९ मधील कामगिरीबद्दल महाराष्ट्रातून टॉपर होत मिळवला मान…

अमळनेर >> तालुक्यातील मारवड पोलीस ठाणे हे महाराष्ट्रातून बेस्ट पोलीस स्टेशन म्हणून निवडले गेले आहे. सदरचा अवार्ड हा सन २०१९ या वर्षाकरता काही निकष लावून मिळाला आहे. पूर्ण देशातून ३६ पोलीस स्टेशन व महाराष्ट्रातून तीन पोलीस स्टेशनला हा बहुमान मिळालेला आहे.


मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, हे दरवर्षी बेस्ट पोलीस स्टेशन निवड करत असते. या निवडीला पुढील प्रमाणे निकष लावण्यात येतात.
१) महिलासंबधी, मालमत्तेसंबंधी व इतर मायनर कायद्यान्वये दाखल गुन्हे, निर्गती, पोलीस भ्रष्ट्राचार केसेस…
२) पोलीस स्टेशन वास्तु व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची वागणुक….
३) जनतेच्या पोलीस स्टेशन व पोलीस कर्मचा-यांबद्दलच्या प्रतिक्रियाबाबत व इतर निरीक्षणाच्या आधारे देशातील १५५७९ पोलिस स्टेशनपैकी ७९ पोलीस स्टेशनची निवड करून वरील बाबींचा सर्वे करून देशातुन टाॅप 10 व प्रत्येक राज्यातुन एक असे टाॅप 36 पोलीस स्टेशनची बेस्ट पोलीस स्टेशन म्हणुन निवड करते.
मारवड पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी,पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे यांनी क्राईम मिटींग, प्रत्यक्ष भेट व इतर माध्यमातून पोलिस ठाण्यातील अधिकारी यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.

महिला व बालकांचे गुन्ह्यांबाबतीत संवेदनशील राहणे, त्यासाठी महिला भरोसा सेल, पोलीस काका-दिदी, यासह शाळा, काॅलेज, बाजारपेठ, ज्येष्ठ नागरिक यांच्या भेटी घेणे, अडचणी दुर करणे असे उपक्रम राबवुन घेवुन जनता पोलीस मैत्री संबंध निर्माण करणे. पोलीस स्टेशनचे कामकाज अपडेट करणे, पोलीस स्टेशन आवार स्वच्छ ठेवणे. यामुळेच सन २०१९ करीता महाराष्ट्रातुन टाॅपर होत मारवड पोलीस स्टेशनला बेस्ट पोलीस स्टेशनचा बहुमान मिळाला आहे. सन २०१९ मध्ये स.पो. नि. समाधान पाटील व १ जुलै २०१९ पासून आतापर्यंत स.पो.नि. राहुल फुला हे या पोलिस ठाण्याची धुरा सांभाळत आहेत. सदर बहुमान मिळाल्याबद्दल विविध स्तरातील मान्यवरांकडून पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गजानन पाटील,अमळनेर✍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *