गोकुळ कोळी प्रतिनिधी मनवेल ता.यावल ::> येथील ग्रामपंचायतीला मुदत संपून आज २२ दिवस उलटले प्रशासकांनी मात्र अद्याप कारभाराची सूत्रे हाती न घेतल्याने प्रशासकाची खुर्ची रिकामीच आहे. दरम्यान येथील राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन येथे प्रशासन येत नसावा ? अशी चर्चा गावात सुरु आहे.
मनवेल येथील ग्रामपंचायतीचा १२ सप्टेंबर रोजी कार्यकाळ संपला. ज्या ग्रा.पं.चा कार्यकाळ संपला त्या ग्रा.पं.ची निवडणूक होइपर्यंत प्रशासक नियुक्तीचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार जिल्हाभरात अनेक कार्यकाळ संपलेल्या ग्रा.पं.वर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र मनवेलला अद्यापही प्रशासन का नाही ? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
प्रशासक नसल्याने गेल्या दोन आठवड्यापासून कामांचा खोळंबा होत आहे. त्यातच येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेवककडे दोन ग्रामपंचायतींचा कारभार आहे. त्यामुळे त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. गावातील मूलभूत समस्यां प्रश्न प्रलंबित आहे.
मनवेल येथे प्रशासक मिळाला असुनही तेवीस दिवसात एक दिवस भेट दिली आहे. त्या नंतर गावाकडे फिरकून ही पाहीले नाही.
यावल प.स.मधील कृषि अधिकारी महिलेची प्रशाषक म्हणून नियुक्ती करण्यात आली असुन तीन गावांचा प्रशासक म्हणून पदभार तर कृषि विभागाच्या पदभार असल्यामुळे प्रशासक महिलेला मोठा ताण सहन करावा लागणार असल्याचे दिसुन येत आहे.
गावात अनेक समस्यांचा अभाव आहे मात्र प्रशासक व प्रशासनाला मोठी डोके दुखी आहे. येथील ग्रामस्थ ग्रामपंचायत मध्ये आल्यावर प्रशासक कोण? रहिवाशी दाखला सह विविध कागदपत्रे सही करिता ग्रामस्थ वारंवार ग्रामपंचायत मध्ये फेऱ्या मारत असल्याचे दिसुन येत आहे. याकडे संबंधित अधिकारी यांनी लक्ष देऊन गावातील समस्या दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.