मनवेल येथे ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या अभियानास सुरुवात

यावल


मनवेल ता.यावल (वार्ताहर) कोरना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजनेचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून मनवेल ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी ‘ या अभियानास ता. दि.१५ सप्टें.२०२० रोजी सुरुवात करण्यात आली.

जळगाव यावल प.स. सभापती सौ. पल्लवी चौधरी यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर शुभारंभ करण्यात आला. यावेळी यावल तहसिलदार जितेद्र कुवर गटविकास अधिकारी निलेश पाटील,तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत बर्हाटे उपसभापती दिपक पाटील, सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरुजीत चौधरी, साकळी प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.स्वाती कवडीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली ५० वर्षे व त्यावरील वयोगटातील व्यक्तींचे आरोग्य सर्वेक्षण करण्यास सुरुवात करण्यात आली.

त्यावेळी अनिल पाटील ,आरोग्य सेविका मालती चौधरी ,आरोग्य सहाय्यक निकुंभ आरोग्य सेविका साविता चौधरी, सलाउद्दीन शेख, ग्रामसेवक हेमंत जोशी पो,पा.विठ्ठल कोळी, आशासेविका रंजना कोळी ,ज्योति मोरे, नागरिक यांचेसह सर्व आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

सदर पहिल्या फेरीचे अभियान दि.१२ सप्टें.ते १५ सप्टें.०२० या कालावधीत राबवले जाणार असून गावातील ५० पेक्षा अधिक वय असलेल्या घराघरातील व्यक्तींची सखोल आरोग्य सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

या आरोग्य सर्वेक्षणासाठी गावातील आशा स्वयंसेविका व नागरिक स्वयंसेवक यांचे एकूण सहा सर्वेक्षण पथके नियुक्त करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे यापुढेही हा सर्वे बावीस दिवस चालणार आहे.

तरी गावातील सर्व नागरिकांनी आपल्या घरी भेट देणाऱ्या आरोग्य सर्वेक्षण पथकांना सहकार्य करून ५० वर्षावरील कुटुंब सदस्यांची तपासणी करून घ्यावी व आपल्या कुटुंबाचा कोरोना या साथराेगापासून बचाव करावा. असे आवाहन गावातील आरोग्य प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *