मांग मातंग समाज जोडणारे व्हा…संघटनेच्या कोषाध्यंक्षपदी ज्ञानेश्वर अवचार यांची निवड

यावल

प्रकाश चौधरी वार्ताहर चुंचाळे ता. : येथील ज्ञानेश्वर विठ्ठल अवचारे राहणार चुंचाळे ता. यावल यांना यावल तालुका कोषाध्यक्षपदी संघटनेचे संघटनेचे पद नियुक्त करण्यात आलेले आहे. हे संघटना भारतीय संविधानाच्या विचाराने तत्वाने चालणारी संघटना आहे. सर्व मानवजातीच्या हितासाठी काम करणारी संघटना आहे.

मुख्यतः मातंग समाज हा इतर जमाती पेक्षा अतिशय जास्त प्रमाणात मागासलेला असल्याने या समाजाचा उत्थान होण्यासाठी सातत्याने सामाजिक चळवळीच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आर्थिक राजकीय आणि संस्कृती या सर्व स्तरावर समाजाच्या उत्थानासाठी काम करत आहे.

भारतातील सर्व महापुरुष यांनी भारताच्या चळवळीसाठी प्रामुख्याने काम केलेले आहे अशा सर्व महापुरुषांना अभिवादन करून आणि त्यांच्या विचाराने हे संघटना चालत आहेत आणि त्याच बरोबर छत्रपती शिवाजी लहुजी साळवे मुक्ता साळवे शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे अमर शेख उमाजी नाईक तंट्या भिल बरसा मुंडा सगळ्या स्तरातील महापुरुषा चे विचार व त्यांना अभिवादन करून विचाराने व सर्व जाती धर्मांना मानणारे व राष्ट्राच्या हितासाठी देशात सांप्रदायिकता बाळगली गेली पाहिजे.

जातिवाद नष्ट झाला पाहिजे मानवधर्म धर्माचा विजय झाला पाहिजे या दृष्टिकोनातून ही संघटना काम करत आहे. म्हणून मुख्यतः मातंग समाजाचा आजची स्थिती अतिशय खालावलेली आहे. म्हणून केंद्र शासन राज्य शासन नाचे आमच्याकडे बराच वेळ दुर्लक्ष होत आहे.

आम्ही ते लक्षात आणून या समाजाचे उत्थान यासाठी लक्ष असू देणे हे गरजेचे असेल आम्ही सर्व संघटनेच्या माध्यमातून अनेक राज्यात संघटना काम करत आहे कार्य करत आहोत. समाजाचे उत्थान यासाठी आतापर्यंत कुणीच काम करत नाही म्हणून भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत ह्या समाजाची शैक्षणिक सामाजिक आर्थिक आणि सर्व क्षेत्रातील परिस्थिती अतिशय नाजूक आहे घालवलेले आहे म्हणलं तरी चालेल म्हणून हे संघटना समाजासाठी अहोरात्र कार्य करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *