प्रतिनिधी मालेगाव >> टवाळखोर तरुणाच्या छेडछाडीस कंटाळून एका २१ वर्षीय तरुणीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शहरातील हिंग्लाजनगरमध्ये रविवारी सकाळी घडली.

सदर मृत तरुणी आपल्या कुटुबीयांसह हिंग्लाजनगरमध्ये वास्तव्यास होती. नंदननगर भागात स्वत:चे ब्युटी पार्लर चालवून ती कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. याच परिसरात रहाणारा एक टवाळखोर तरुण तिची छेड काढत होता.

हा प्रकार तिने कुटुंबीयांना सांगितला होता. काही नागरिकांनी तरुणास समज देत पुन्हा छेड न काढण्याची तंबी दिली होती. मात्र, तरुणाने छेडछाडीचा प्रकार सुरुच ठेवल्याने तरुणीने शनिवारी रात्री रहात्या घरी विषारी औषध प्रशासन केले.

हा प्रकार लक्षात आल्याने कुटुंबीयांनी तिला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना रविवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौकशी करण्यात ये असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *