धुळे ::> देवपुरातील मित्राकडे आलेल्या मालेगाव येथील तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. मध्यरात्री या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.
मालेगावच्या कॅम्पमधील पंचशीलनगरात राहणारा तरुण मनोज आनंद देवरे (वय ३०) हा धुळ्यात आला होता. गोंदूर रोडला लागून असलेल्या एका ठिकाणी तो थांबला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार मनोज हा धनदाई नगरात राहणाऱ्या एका मित्राकडे मुक्कामी होता. शुक्रवारी रात्री उशिरा त्याने गळफास लावून घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या ठिकाणी डॉ. सुरभी चौरसिया यांनी मनोजला मृत घोषित केले. मनोज हा बी.एसस्सी पदवीधर होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. त्याचा भाऊ नितीन आनंद देवरे यांच्या माहितीवरून पश्चिम देवपूर पाेलिस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.