धुळे ::> दोन वेगवेगळ्या घटनेत देवपुरातील गोंदूररोड परिसर व साक्री येथून दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेण्यात आले. गोंदूररोड परिसरातील १७ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. नैसर्गिक विधीला जात असल्याचे कारण सांगून ती घराबाहेर पडली होती. या परिसरात राहणाऱ्या रामलाल गोपीचंद बागुल याने आमिष दाखवून मुलीला पळवून नेल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने दिली आहे. त्यानुसार पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
दुसऱ्या घटनेत साक्री तालुक्यातील कोकले गावातून सोळा वर्षीय मुलगी बेपत्ता झाली. ती कासारे येथे राहणारी असून मावशीकडे आली होती. रवींद्र विलास मोरेने आमिष दाखवून तिला पळवून नेल्याची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांची तक्रार आहे. साक्री पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.