बोदवड तालुक्यात महिलेचा विनय भंग ; गुन्हा दाखल

क्राईम बोदवड

बोदवड >>तालुक्यातील लोणवाडी येथील ३७ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना २९ रोजी, धोंडखेडा शिवारात घडली होती. शेताच्या रस्त्याने जाणाऱ्या नाल्याजवळ संशयित अजय सुपडू परदेशी याने महिलेचा विनयभंग केला होता. त्यामुळे पीडीतेच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिस स्टेशनमध्ये कलम ३५४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. संशयिताला अटक केली आहे.