राजुरा येथे लॉकडाऊन मध्ये पार पडला आगळावेगळा व आदर्श विवाह सोहळा

मुक्ताईनगर

विशेष म्हणजे वर आणि वधू हे दोन्ही ही मूकबधिर आहेत

मुक्ताईनगर प्रतिनिधी) कैलास कोळी :
लॉकडाऊनमुळे विवाह समारंभ व विविध कार्यक्रमांना बंधने आल्याने सोशल डिस्टनसिंग पाळत व तोंडाला माक्स लावून विवाह सोहळे उरकले जात आहेत, तर अनेकांनी हौस मौज होणार नाही म्हणून विवाह सोहळे पुढच्या वर्षी ढकलले आहेत.

मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा येथे आज दि.८ मे रोजी एक आदर्श असा विवाह सोहळा संपन्न पार पडला, विक्रम सुरवाडे याचे चिरंजीव श्रीमान नितेश रा,तोरणाळा ता जामनेर व,राजुरा येथील श्री विद्याधर झनके याची कन्या चि,सौ,का, प्रतिक्षा हीचे लग्न राजुरा ता, मुक्ताईनगर येथील बुध्द विहारात बौद्ध पद्धतिने बोधाचार्य नी पारंपरिक पद्धतीने विवाह पार पाडले.

या विवाह सोहळ्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच नातेवाईकांची व मुलीचे आईवडील, मुलाचे आईवडील नियमानुसार गावातील ग्रामस्थांची उपस्थिती होती ह्या विवाह सोहळ्याला लोकप्रतिनिधी सरपंचव शासनाचा प्रतिनिधी म्हणून ग्रामसेवक उपस्थित होते कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत व सोशल डिस्टनसिंग पाळत व संचारबंदी च उल्लंघन न होता ,विवाह सोहळा पार पडल्याने इतरांनी देखील यांचा आदर्श घ्यावा असच म्हणावं लागेल. सरपंच व ग्रामसेवक यांनी आयुष्याच्या शुभेच्छा देताना या आदर्श विवाहाप्रमाणेच वैवाहिक आयुष्य देखील आदर्शवत जगावे व स्वतःची व आईवडिलांची काळजी घ्यावी अश्या अपेक्षा व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *