‘आगे कुछ तो होनेवाला है’ राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत एकनाथ खडसेंचे सूचक वक्तव्य !

Politicalकट्टा कट्टा मुक्ताईनगर

मुक्ताईनगर कैलास कोळी प्रतिनिधी ::> माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या बातम्या जोर धरू लागल्या आहेत. यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी ‘आगे कुछ तो होनेवाला है’ असे सूचक वक्तव्य केले.

कोथळी (ता.मुक्ताईनगर) येथील निवासस्थानी बोलताना खडसे यांनी पक्षांतराचा सस्पेन्स कायम ठेवला. मंगळवारी भाजपने धार्मिक स्थळे खुली करण्याच्या मागणीबाबत आंदोलन केले.

या आंदोलनाला खडसे अनुपस्थित होते. तसेच जामनेर येथे झालेल्या जीएम हाॅस्पिटलच्या उद्घाटनाकडेही त्यांनी पाठ फिरवली होती.

याबाबत त्यांना विचारल्यावर ‘आगे कुछ तो होने वाला है’ असे खडसे म्हणाले. घटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकत आहेत. मात्र मी कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप नक्की नाही, असेही ते म्हणाले.