१९ हजारांची लाचेची मागणी करणारा पोलीस एसबीच्या जाळ्यात

अमळनेर क्राईम चोरी, लंपास धरणगाव निषेध पाेलिस

जळगाव >> ६ मार्च रोजी जिल्ह्यातील धरणगाव पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विलास सोनवणे रा.अमळनेर या आरोपीने बांभोरी बु. ता.धरणगाव येथील ४८ वर्षीय अर्जदाराकडून १९ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. भा . द . वि . कलम ४२० नुसार दाखल गुन्ह्यात अनुकूल आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यासाठी १९ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला आज लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून पकडले.

तक्रारदाराने ही लाचेची मागणी होत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली होती धरणगाव पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विलास सोनावणे ( बक्कल नं.२७८६ , रा.अमळनेर ) असे या आरोपी पोलिसांचे नाव आहे

तक्रारदार यांच्या विरूध्द धरणगाव पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या भादवि कलम- ४२० च्या गुन्ह्याचा तपास आलोसे यांचेकडे असुन गुन्ह्याचे अनुकूल चार्जशीट न्यायालयात पाठविण्याच्या मोबादल्यात आलोसे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे 19,000/- रूपयांची लाचेची मागणी केली व तक्रारदाराकडे असलेले डिव्हाइस हिसकावून नेले म्हणुन अमळनेर पोलीस स्टेशन गु.र.नं.११९/२०२१ भ्र.प्र.अ.-कलम-७ सह कलम-३९२, २०१, १८६ भादवि अन्वये आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या या सापळा पथकात उप अधीक्षक गोपाल ठाकुर, पोलीस निरीक्षक . निलेश लोधी, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर. यांचा समावेश होता नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने , अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे ,पोलीस उपअधीक्षक .विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा रचण्यात आला होता