राज्य सरकार विरोधी ९ नोव्हेंबर रोजी किसान मोर्चा : खा. रक्षा खडसे यांची माहिती

Politicalकट्टा कट्टा फैजपूर यावल रिड जळगाव टीम शेती

यावल प्रतिनिधी ::> केळी पीक विमा व शेतकरी विरोधी राज्य सरकार विरोधातील दि. ०९ नोव्हेंबर च्या किसान मोर्चा संदर्भात फ्रुटसेल सोसायटी न्हावी ता.यावल येथे बैठक घेण्यात आली.

यावेळी उत्तर महाराष्ट्र किसान मोर्चा संयोजक सुरेश धनके, नारायणबापू चौधरी, फ्रुटसेल सोसायटी चेअरमन शरद महाजन, श्री.किशोर विठ्ठल कोलते, डॉ.भरत झोपे, श्री.गणेश नेहते, श्री.नरेंद्र नारखेडे, श्री.भोजराज बोरोले, श्री.भानू चोपडे, श्री.नितीनचौधरी, श्री.उमेश फेगडे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच बैठक नियोजक नितीन सर, यशवंत तळेले व बामणोद, न्हावी, हिंगोणा, बोरखेडा, पाडळसा, भालोद, चिखली, हंबर्डी, फैजपूर गणातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.