करमाड येथे दोन भावांना किरकोळ कारणाने मारहाण

क्राईम पारोळा

पारोळा >> कट मारल्याच्या कारणावरून जाब विचारल्याने दोन जणांना मारहाण झाल्याची घटना करममाड येथे २३ रोजी घडली. याप्रकरणी दोन महिलांसह एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

दीपक साहेबराव पाटील हे पत्नीसह शेतातून दुचाकीने घरी येत होते. वाटेत ज्ञानेश्वर लोटन पाटील याने त्याच्या वाहनाने दीपक पाटील यांच्या दुचाकीला कट मारला. घटनेनंतर ज्ञानेश्वर पळून गेला.

या घटनेनंतर दीपक पाटील यांनी भाऊ वसंत पाटील यांना सोबत घेत ज्ञानेश्वर याच्या घरी जाऊन जाब विचारला. संशयित ज्ञानेश्वर लोटन पाटील, पंकज पाटील, लोटन धोंडू पाटील, मंगलबाई पाटील, सुजित दिलीप पाटील व बबिता पाटील यांनी दोन्ही भावांना मारहाण केली.