यावल‎ >> तालुक्यातील किनगावातून‎ गिरडगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या‎ डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात‎ आले आहे.

जिल्हा परिषदेच्या‎ सदस्य अरुणा पाटील यांच्या‎ निधीतून या रस्त्याचे काम होत‎ असून शेतकरी वर्गासाठी‎ महत्त्वाच्या असणाऱ्या या रस्त्याचे‎ डांबरीकरण होत असल्याने‎ शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत‎ आहे.‎

या कामासाठी जिल्हा परिषदेच्या‎ निधीतून १२ लाख रुपये मंजूर‎ करण्यात आले आहेत. त्यातून‎ किनगाव बुद्रुक गावातील चौधरी‎ वाडा भागातून जाणाऱ्या गिरडगाव‎ जुन्या रस्त्याचे डांबरीकरण केले‎ जात आहे.

या रस्त्याचा वापर‎ मोठ्या प्रमाणावर किनगावातील‎ शेतकरी करतात. या रस्त्यावरून‎ शेती उत्पादन गावापर्यंत आणले‎ जाते. त्यामुळे या रस्त्याचे‎ डांबरीकरण करण्याची मागणी‎ शेतकऱ्यांनी केली होती.

आता‎ प्रत्यक्षात या कामाला सुरुवात झाली‎ आहे. या कामाची जिल्हा परिषदेचे‎ माजी सदस्य आर.जी. पाटील यांनी‎ पाहणी केली.

काम दर्जेदार पद्धतीने‎ झाले पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील‎ आहेत. या कामामुळे संपूर्ण‎ परिसरातील दळणवळणाच्या‎ सुविधेत वाढ होणार आहे.‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *