भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

एरंडोल क्राईम निषेध पाेलिस म्हसावद

एरंडोल >> तालुक्यातील नागदुली येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविण्यात आल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी पोलिस स्टेशनला दिली आहे. ही मुलगी म्हसावद येथे आठवडे बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेली होती.

सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी न आल्यामुळे तिच्या परिवारातील सदस्यांनी शोध घेतला मात्र ती आढळून आली नाही. याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चंद्रकांत पाटील तपास करीत आहेत. या घटनेमुळे नागदुली परिसरात खळबळ उडाली असून चर्चांना उधान आले आहे.